breaking-newsक्रिडा

सचिनसोबत डिनरनंतर पृथ्वी शॉचे ट्विट, म्हणाला…

अगदी लहान वयातच आपल्या तुफान फलंदाजीमुळे प्रत्येक मुंबईकराला ठाऊक झालेला चेहरा म्हणजे पृथ्वी शॉ. मुंबईकर पृथ्वी यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आज फिरोजशाह कोटलाच्या मैदानात दिल्ली विरुद्ध मुंबईचा सामना रंगणार आहे. असे असतानाच पृथ्वी मात्र वेगळ्याच कारणामुळे खूष असल्याचे चित्र दिसत आहे. पृथ्वीनेच एक फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.

पृथ्वीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये पृथ्वी सचिन तेंडुलकरबरोबर डिनर करताना दिसत आहे. या कायम आठवणीत राहणाऱ्या डिनर डेटबद्दल पृथ्वी म्हणतो, ‘ इतक्या छान डिनरसाठी धन्यवाद सचिन सर. तुमची भेट नेहमीच आनंद देणारी असते.’

Prithvi Shaw

@PrithviShaw

Thank you SACHIN SIR for the lovely dinner ♥️ It’s always a pleasure meeting you SIR 😌 @sachin_rt Sir

1,090 people are talking about this

यंदाचे आयपीएल आत्तापर्यंत पृथ्वीसाठी म्हणावे तितकसे चांगले गेले नाही. एका डावातील ९९ धावा वगळता त्याला दिल्लीकडून खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. ८ सामन्यांमध्ये पृथ्वीने २३.३७ च्या सरासरीने १८७ धावा केल्या आहेत. दिल्लीचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी मागील तिनही सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु, कोलकाता नाईटरायडर्स आणि सनरायझर्स हौदराबादला दिल्लीने धूळ चारली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाची कामगिरी या पर्वात म्हणावी तशी झालेली नाही. मागील तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात मुंबईला विजय तर एका समान्यात पराभवाचा समाना करावा लागला आहे. मुंबई किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्धचे सामने जिंकली तर राजस्थान रॉयर्लने मुंबईचा पराभव केला. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button