breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संवर्धनाबाबत अनभिज्ञ उद्यान विभागाला यावर्षी दीड लाख वृक्ष लागवडीचे ‘टार्गेट’

पिंपरी, (महाईन्यूज) – वृक्षसंवर्धनाकडे पाठ फिरविणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीचे टार्गेट दुप्पट ठेवले आहे. मागच्या वर्षीच्या टार्गेटमधील 55 हजार वृक्षांपैकी किती झाडे जगवली याचे उत्तर या विभागाकडे नाही. तरी, आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून या विभागाला यावर्षी 1 लाख 50 हजार वृक्ष लावण्याचे टार्गेट दिले आहेत.

गेली कित्येक वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील रस्ते, मोकळ्या जागा, शाळा, पोलीस स्टेशन, स्मशानभूमी, हॉस्पीटल, क्रिडांगण, उद्याने आदी भागात वृक्ष लागवड करत आली आहे. यावर्षी पुन्हा त्याच ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय वृक्षारोपण करण्यासाठी तब्बल 30 हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवले आहे. महामेट्रो 5 हजार झाडे लावणार आहे. त्याचाही समावेश महापालिकेच्या उद्यान विभागाकडील टार्गेटमध्ये करण्यात आला आहे. सांगवीच्या हद्दीतील औंध इन्फट्री ब्रिगेड कॅम्पात झाडे लावण्यासाठी 35 हजार रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. त्याची दोन वर्षे देखभाल दुरूस्ती करवून घेतली जाणार आहे. देहूरोड येथील मिलीटरी हद्दीतील स्टेशन हेडक्वार्टर या भागातील तळवडे, रुपीनगर भागात झाडे लावण्यासाठी 30 हजार रोपे देण्यात येणार आहेत. दोन वर्षे देखभाल दुरूस्ती करवून घेतली जाणार आहे.

दिघी येथील मिलीटरी बीईजी येथे 35 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. दोन वर्षासाठी त्याची देखभाल दुरूस्ती करवून घेतली जाणार आहे. तसेच, शहरातील सोसायट्यांमध्ये 10 रोपे लावण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरीक, संस्था, कारखाने, एनजीओ यांना पाच हजार रोपे मोफत वाटप केली जाणार आहेत. अशी एकूण 1 लाख 50 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. यावर्षीचे उद्यान विभागाला एवढे वृक्ष लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button