breaking-newsपिंपरी / चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संत जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी हभप गणेश पवार महाराजांनी उपस्थितांना जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्यांचे विश्लेषन करून तुकोबारायांचे विद्रोही विचार सांगितले. तसेच, आण्णा सावंत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक सतिश कदम, संतोष बादाडे, दिपक जोगदंड, छावाचे राजेंद्र देवकर, राजु पवार, गणेश सरकटे, अतुल वर्पे, आम आदमी पार्टीचे प्रकाश पठारे, अशोक सातपुते, अंबादास जाधव, देवेंद्र काळभोर, विनायक जाधव, नितीन इंगोले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांनी आभार मानले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button