breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संप आणि वीकेंडमुळे तीन दिवस बँका बंद! कामे उरकून घ्या

मुंबई – राष्ट्रीय व्यापार संघटनांनी उद्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (All India Bank Employees’ Association – AIBEA) (एआयबीईए) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित तुमची कोणती कामे राहिली असतील तर ती आजच पूर्ण करा. कारण देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने याचा बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना सूचना दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्याच्या संपानंतर शुक्रवारी बँकांचे कामकाज सुरळीत होईल. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद राहतील.

एआयबीईएच्या दाव्यानुसार महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि परदेशी बँकांचे सुमारे 30 हजार कर्मचारी संपात सहभागी होतील. एआयबीईए ही स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक वगळता बहुतांश बँकांचे प्रतिनिधित्व करते.

संपाचे कारण काय?
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभेने तीन नवीन कामगार कायदे मंजूर केले आणि व्यवसाय सुलभतेच्या नावाखाली विद्यमान 27 कायदे रद्द केले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगाच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. नवीन कायदे या कामगारांना कोणतेही संरक्षण देणार नाहीत, असे ‘एआयबीईए’चे म्हणणे आहे.

दरम्यान, उद्याचा संप किंवा सुट्टीचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच ग्राहकांना नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करता येणार आहे. तसेच एटीएममधून पैसेही काढता येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button