breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

संत तुकाराम पालखी सोहळा : उद्योगनरीत हरिनामाचा गजर; दर्शनासाठी जनसागर लोटला

 

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

या अभंगवाणीप्रमाणे तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी अतुरतेने पंढरीच्या वाटेवर दरमजल करत निघालेला लाखो वारकऱ्यांचा समुदाय अन्‌ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात उद्योगनगरीत शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी पाचच्या सुमारास दाखल झाला. नगारा वाजवत टाळ, मृदंग अन्‌ विणेच्या निनादात विठू नामाचा गजर सर्वत्र दुमदुमत होता. पालखीचे स्वागत करण्यासाठी एकत्रित झालेल्या शहरातील चाकरमान्यांनी संत तुकारामांच्या पादुकांचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. वर्षातून आषाढी एकादशीनिमित्त होणारा हा अतुलनीय सोहळा शहरवासियांनी डोळ्यांत साठवून घेतला.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प उद्यानासमोर दाखल झाला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून विविध राजकीय पक्षांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीने वेगवेगळी व्यासपीठे उभारण्यात आली होती. व्यासपीठासमोर पालखी येताच दिंडीक-यांना भेट वस्तू देऊन सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

विविध फुलांनी पारंपरिक पद्धतीने सजविलेला संत श्री तुकारामांचा पालखी रथ मोठ्या दिमाखात पुढे येत होता. त्यापाठोपाठ दरमजल करत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्या पाऊले चालती… पंढरीची वाट! या गीताप्रमाणे रस्ता कापत होत्या. विणेकरी, टाळकरी मंडळी हरिनाम, संत अभंगवानी म्हणण्यात तल्लीन होते. मृदंग अन्‌ टाळ वाद्याच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात सहभागी झालेला लाखो वारकऱ्यांचा समुदाय अथांग पसरलेला होता. एकूणच उद्योगनगरीला पंढरीचे स्वारूप प्राप्त झाले होते. शहरातील चाकारमान्यांसह कामगारांनी पालखी रथातील संत तुकारामारांच्या पादुकांचे अतुरतेने दर्शन घेतले. पोलीस अन्‌ पोलीस मित्रांच्या सहकार्याने पालखी सभोवतीच्या समुदायावर नियंत्रण मिळविण्यात येत होते. त्यामुळे सर्वांना शिस्तबध्द पध्दतीने दर्शन घेता आले. सायंकाळी पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी रवाना होणार आहे.

महापालिकेतर्फे नगरसेवकांच्या मानधनातून खरेदी करण्यात आलेली ताडपत्री पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना देऊन सत्कार करण्यात आला. महापौर नितीन काळजे, आमदार  महेश लांडगे,  उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button