पिंपरी / चिंचवड

संत तुकारामनगरात छत्रपती शिवाजी महाराजांना विविध कार्यक्रमातून मानाचा मुजरा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रभाग क्रमांक २०, महेशनगर येथे अखिल संत तुकाराम नगर महिला प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना एकत्रीत वंदन दिली. अनेक शिवभक्तांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली.

सकाळी सात ते सायंकाळी दहापर्यंत शिववंदना, समूहगीत, ध्वज संचलन, लेझीम, पारंपारिक लोकनृत्य, साहसी खेळ, मल्लखांब इत्यादी कार्यक्रम उत्साहात पार पडले. महेशनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संस्कार शिल्प मुख्य आकर्षक असल्याने शहरातील तरुण वर्ग भगवे झेंडे घेवून, दुचाकीवरून या भागामध्ये आवर्जून भेट देत होते.

यावेळी प्रभागाच्या नागरेविका सुजाता पालांडे यांनी शिवनेरी गडावरील माती आणून येथील परिसरात शिवतीर्थ पावित्र्य राखण्याची शपथ घेतली. महेशनगर चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. लवकरच स्मारकाचा आराखडा तयार केला जाईल. असे अखिल संत तुकाराम नगर महिला प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून चौपाटी येथील जागा शिव स्मारकासाठी प्रस्तावित आहे. याबाबत आमचा वारंवार पाठपुरावा सुरु असून लवकरच याठिकाणी शिवसृष्टी स्मारक तयार होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.’’

 – सुजाता पालांडेनगरसेविका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button