breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

संतापजनक! अंधेरी स्थानकावर सरकता जिना अचानक उलट्या दिशेने सुरु…दोन प्रवासी जखमी (VIDEO)

मुंबई | महाईन्यूज

नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकावर अचानक सरकता जिना उलट्या दिशेनं धावू लागल्यानं प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आहे. यात दोन प्रवाशी जखमी झाले. स्थानकावरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. सुदैवानं मोठा अनर्थ टळला.

१७ फेब्रुवारीला हा सर्व प्रकार घडला आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या अंधेरी स्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यातच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना अचानक उलटा फिरु लागला अपघातावेळी सरकत्या जीन्यावर प्रवाशांची गर्दी होती मात्र सुदैवानं हा अपघात टळला आहे.

पुलावर जाण्यासाठी या सरकत्या जिन्यांचा वापर हजारो प्रवाशांकडून करण्यात येतो, मात्र हा झटपट मार्ग धोकादायक ठरतोय की काय अशी भीती आता प्रवाशांना वाटू लागलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button