breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतपीठ समितीत सांप्रदायीकतेचा वारसा लाभलेल्या हभपंची नियुक्ती करा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीतील प्रस्तावीत संतपीठ समितीमध्ये सदस्य म्हणून येड्या-गबाळ्या व्यक्तीची नेमणूक न करता संत साहित्याचा अभ्यास असणा-या व सांप्रदायीक वारसा लाभलेल्या हभपंची निवड करावी, अशी सूचना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

यासंदर्भात लांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. त्यात नमूद आहे की, श्रीक्षेत्र आळंदी, देहू, भंडारा डोंगर, तिर्थक्षेत्राच्या पावन भूमीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास निधीतून चिखली येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची उभारणी होत आहे. त्याचे कामकाज सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंपनी स्थापन केली आहे. त्यामध्ये वारकरी सांप्रदयाचा प्रचार आणि प्रसार करणारे हभप, धर्मशाळाप्रमुख, दिंडीप्रमुख आदी मान्यवरांचा सहभाग असणे अतिमहत्वाचे आहे.

नियोजित संतपीठ समितीमध्ये प्रामुख्याने हभप बंडातात्या कराडकर, हभप कु-हेकर महाराज, गाथा मंदिर प्रमुख हभप पांडुरंग महाराज घुले, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, तळवडे, चिखली, मोशी, डुडूळगाव, च-होली, दिघी, पिंपरी-चिंचवड, देहू, आळंदी, भोसरी या पंचक्रोशीतील दिंडीप्रमुखांचा समावेश असावा. तसेच, वारकरी सांप्रदयातील स्थानिक प्रमुख ज्यांनी सांप्रदाय व संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मागेपुढे वरिल गावच्या दिंड्यांतील सांप्रदयाचा प्रसार करणा-या मंडळींचा समितीमध्ये समावेश करावा, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

माजी आमदार लांडे यांनी हे निवेदन राज्याचे सांस्कृतीक कार्य व शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना देखील दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button