breaking-newsपिंपरी / चिंचवड

संतपीठ, मेट्रो स्टेशन, उद्यानांना दत्ताकाका साने यांचे नाव द्या, छावा संघटनेची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांना सामाजिक कार्य करताना कोरोनाचा संसर्ग होऊन वीर मरण आहे. लॉकडाऊनमध्ये जनसामान्यांची भूक भागविताना दत्ताकाकांनी हौतात्म्य पत्करले. अशा या महान व्यक्तीमत्वाचे चिखली परिसरातील प्रस्तावीत संतपीठ, उद्यान, चिंचवड किंवा निगडी मेट्रे स्टेशन, साने चौक या ठिकाणांना दत्ताकाका साने यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष विजय जरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात नगरसेवक म्हणून दत्ताकाकांनी मोलाचे योगदान दिले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार, अन्याय व अवैध धंदे यांच्याविरूध्द त्यांनी दिलेला लढा विसरण्याजोगा नाही. दरम्यान, कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन असताना दत्ताकाकांनी समाजात भुकेलेल्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन अन्नधान्य दिले. समाजातील वंचित घटकांची मदत करताना साने यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन वीरमरण आहे.

चिखली प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी साने यांनी हौतात्म्य पत्करले आहे. चिखलीची पायाभूत रचना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेरीत आहे. तथापि, चिखली येथील साने चौक, संतपीठ, चिचवड किंवा निगडी मेट्रो स्टेशन आदी महत्वाच्या ठिकाणांना दत्ताकाका साने यांचे नाव द्यावे. हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी जरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button