breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सॅनिटायझरच्या किमती वाढणार; लागणार 18 टक्के जीएसटी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे,सॅनिटायझ करणे हे किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहित आहे . साबण किंवा सॅनिटायझरने हात धुतल्यास कोरोनापासून बचाव होतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण आता तेच सॅनिटायझर महागणार आहे. कारण अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरवर आता १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगने (एएआर) म्हटलं आहे.

याप्रकरणी गोव्यातील स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीज कंपनीने एक याचिका दाखल केली होती. एएआरने त्यावर निर्णय देताना अल्कोहोल असलेले सॅनिटायझर जीएसटीच्या १८ टक्क्यांच्या टप्प्यात येत असल्याचे म्हटले. सॅनिटायझरच्या वर्गीकरणात स्पष्टता यावी यासाठी एएआरच्या गोव्यातील पीठाकडे स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीजने याचिका दाखल केली होती. आम्ही कंपनीकडून उत्पादन आणि पुरवठा करत असलेल्या सॅनिटायझरला जीएसटीमधून सूट मिळाली आहे का, अशी विचारणा केली होती. त्यावर अल्कोहोलचा समावेश असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचे एएआरने सांगितले.

अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरच्या श्रेणीत याचिकाकर्त्यांकडून उत्पादित सॅनिटायझर अल्कोहोलचा समावेश होतो. एचएसएन ३८०८ शीर्षकाखाली त्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे १८ टक्के जीएसटी त्यावर लागेल. ग्राहकांशी संबंधित असलेल्या मंत्रालयाने हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे. पण जीएसटीतून सूट देण्यात आलेल्या उत्पादनांची यादी वेगळी असल्याचे एएआरने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button