breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवशाही बस कात्रज घाटात कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

बस मध्ये 40 प्रवासी होते, 50 फुट खोल दरीत बस कोसळली

पुणे – पुण्यावरुन सांगलीकडे जाणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात 50 फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन सांगलीकडे जाणारे शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्याजवळील कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना अपघात घडला.घाटात बस 50 फुट खोल दरीत कोसळली, बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button