breaking-newsमनोरंजन

‘संजु’वर ‘धडक’चा काहीच असर नाही ! संजू टाॅप 5 मध्ये

नवी दिल्ली: रणबीर कपूरचा संजू चित्रपट दिवसेंदिवस कमाईचे नवीन उच्चांक गाठत आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेला ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले. तरी देखील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होत नाही आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया च्या माहितीनुसार, संजूने सुरवातीच्या 23 दिवसांमध्ये ३२२ करोड रुपये कमविले आहेत. लवकरच हा चित्रपट ३२५ करोडचा पल्ला गाठणार आहे.

संजूला फाईट देण्यासाठी नुकताच जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ‘धडक’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तरी देखील संजूच्या कमाईवर परिणाम झाला नाही.

जाणून घ्या सर्वाधिक कमाई केलेले 5 चित्रपट

1- ‘बाहुबली-2’ : 510.36 करोड
2- ‘दंगल’- 374.53 करोड
3- ‘टाइगर जिंदा है’- 339.00 करोड
4- ‘पीके’- 337.72 करोड
5- ‘संजू’- 322 करोड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button