breaking-newsमनोरंजनमुंबई

संजय दत्त या मतदारसंघातून लढणार लोकसभा निवडणूक?

बहिण प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता अभिनेता संजय दत्तदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त आहे. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

२००९ साली जेव्हा संजय दत्तने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहाखातर त्याने ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नाही. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.

आता पुन्हा एकदा संजय दत्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सपा संजयला गाझियाबादमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्ष गाझियाबादमध्ये केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्यासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. यासाठी शत्रुघ्न सिन्हा आणि संजय दत्त यांची नावं चर्चेत आहेत.

संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. तर बहिण प्रिया दत्तदेखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button