breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संगीत अकादमीमुळे सांस्कृतीक क्षेत्रात शहराचा नावलौकीक – महापौर जाधव

  • पिंपरी-चिंचवड मनपा संगीत अकादमीचा वर्धापन दिन साजरा
  • कलाकारांच्या संगीत सादरीकरणाने रसिक झाले मंत्रमुग्ध

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी चिंचवड संगीत अकादमीच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात शहराचा नावलौकिक होवून भविष्यात शहरातून अनेक नामवंत कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.

  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीच्या १९ व्या वर्धापन दिनाचे उदघाटन जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज व्यापारी संकुल, निगडी येथे त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहय्यक आयुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, हे शहर औद्योगिक नगर म्हणून नावारुपाला आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगीत आकदमीमुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. तसेच, शहरातील गोरगरीब मुलांना संगीताची गोडी लागून अनेक वादय, गायन इ. संगित शिक्षणाचा लाभ होत आहे.

  • आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, एखादी संगीत संस्था १९ वर्षे निरंतर सेवाकरत आहे. ही बाब आव्हाणात्मक असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीच्या माध्यामातून ही सांस्कृतिक सेवा होत असल्याचा शहर वासियांना अभिमान वाटावा, अशी गोष्ट आहे.

यावेळी अनेक विदयार्थ्यांनी गाणी गावून रसिकांना मंत्रमूग्ध्द केले. संगीत शिक्षक वैजंती भालेराव यांचे शिष्य सुवर्णा भोंडे यांनी सुगम संगीत या प्रकारात उंच माझा झोका हे गाणे गावून रसिकांची दाद मिळविली. उमेश पुरोहित, संतोष साळवी यांनी गायनास साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रिडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी केले. तर, आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button