breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सख्या भावानेच केला भावावर खुनी हल्ला

पिंपरी |महाईन्यूज|

किरकोळ भांडणाची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावावर तसेच पुतण्यावर खुनी हल्ला केला. सूस (ता. मुळशी) येथील ननवरे वस्तीवर रविवारी (ता. 23) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यात रशिकांत कचरे व त्यांचा मुलगा तुषार गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. टीना रशिकांत कचरे यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे, सोन्या व महिंद्र (यांची पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

​पोलिस उपनिरीक्षक मीनानाथ वरुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी तुषार व आरोपी विकास व शशिकांत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्याची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून तलवार व कुऱ्हाडीने तुषार व रशिकांत यांच्यावर वार केले. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button