breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी संघटनेच्या ‘मी पण गुन्हेगार’ आंदोलनास प्रारंभ

मनाई असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची लागवड करीत शेतकरी संघटनेने शुक्रवारी ठिकठिकाणी ‘मी पण गुन्हेगार’ या आंदोलनास सुरुवात केली आहे. एचटीबीटी व जीएम या जनुकीय तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांची लागवड करू देण्याची या संघटनेची मागणी आहे. केंद्राने या बियाण्यांवर बंदी घातली असून लागवड करणाऱ्यास पाच लाख रुपयांचा दंड व पाच वर्षे कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र याच बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकते, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

जगात नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. त्यावर आधारित बियाण्यांची जगभरातील शेतकरी लागवड करीत असून त्याचा लाभ जागतिक बाजारपेठेत त्या शेतकऱ्यास मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत अन्नधान्य व कृषीवर आधारित बाजारपेठ करण्याचे ध्येय संघटनेने व्यक्त केले. या बदलत्या स्थितीत रोजगार देण्याची क्षमता व उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता एचटीबीटी बियाण्यातच असल्याचे संघटनेने स्पष्ट करीत आंदोलनास प्रारंभ केला.

लढा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार

युवा आघाडीचे कार्याध्यक्ष प्रमोद तलमले तसेच गणेश नेहारे, मारोती सलामे, नरेश वाघाडे व अन्य शेतकऱ्यांनी खातखेडा गावात बियाणे लागवड केली. टाकळी गावात मुकेश धाडवे, विशाल फाळके यांनी जनुकीय बियाणे लावले. माझ्या शेतात तंत्रज्ञान स्वतंत्र आंदोलन सुरू झाल्याचे जाहीर करीत किशोर रूईकर, महादेव गोहो, मनोहर ढवळे यांनी मजरा गावात लागवड केली. संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी हे गृह विलगीकरणात असल्याने त्यांनी आपल्या कुटुंबासह घराच्या परसदारात बियाणे लागवड करीत आंदोलनात भाग घेतला. हा लढा अखंड चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button