breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचा फैलाव तीव्रच

सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांसह मृतांचा आकडा वाढत असता जिल्हा ग्रामीण भागात शुक्रवारी पुन्हा करोनाबाधित नव्या सात रुग्णांची भर पडली आहे. तर अक्कलकोटमधील एका वृद्ध रुग्ण दगावला. शहर व जिल्ह्यात मिळून रुग्णसंख्या १५११ तर मृतांची संख्या १३० वर पोहोचली आहे. मात्र सध्या उपचार घेणाऱ्यांपेक्षा करोनामुक्त होऊ न घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या शहरातील १४०१ आणि ग्रामीणमधील ११० इतकी झाली आहे. तर शहरातील मृतांची संख्या १२३ आणि ग्रामीणमधील मृतांची संख्या ७ झाली आहे.

शहरातील करोनामुक्त रुग्ण ७७२ तर ग्रामीणमधील ३३ आहेत. शहरातील ५०६ आणि ग्रामीणमधील ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात काल एकाच दिवशी ९१ करोनाबाधित रुग्ण सापडले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत २५० पेक्षा अधिक ठिकाणी करोना विषाणूचा फैलाव झाला आहे. काल रात्री रविवार पेठेत सात, भवानी पेठ व न्यू बुधवार पेठेत प्रत्येकी पाच, तर न्यू पाच्छा पेठेत चार रुग्ण आढळून आले. बाळे, घोंगडे वस्ती व साखर पेठेत प्रत्येकी तीन रुग्ण सापडले. होटगी रस्त्यावरील काडादीनगरात एका डॉक्टरला करोनाची लागण झाली. अक्कलकोटमध्येही एका डॉक्टरला करोनाची बाधा झाली आहे. अकलूज, मोहोळ तालुक्यातील सोहाळे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग व कुंभारी येथील नवीन विडी घरकूल आदी परिसरात नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात सर्वाधिक ४४ रुग्ण दक्षिण सोलापुरातील आहेत. करमाळा व मंगळवेढा हे दोन तालुके अद्यापि करोनामुक्त राहिले आहेत.

दरम्यान, शासनाच्या नव्या नियमावलीनुसार करोनाशी संबंधित वैद्यकीय चाचण्यांचे प्रमाण घटविण्यात आले असून सध्या शहर व जिल्ह्यात मिळून केवळ १७७ चाचणी अहवाल प्रलंबित राहिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button