breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुखांचा स्वीय सहायकासह वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह

सांगोला |महाईन्यूज|

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पीए व वाहन चालक हे दोघेजण कोरोनाबाधित झाले आहेत. माजी आमदार देशमुख कोरोनाच्या काळातही अनेक नागरिकांना, कार्यकर्त्यांना भेटत असतात. त्यामुळे अनेकजणांचा संपर्क त्यांच्याशी होत असतो. अशावेळी या दोघांच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहन गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

माजी आमदार गणपतराव देशमुख कोरोनाच्या काळातही आपल्या वयाकडे लक्ष न देता नागरिकांना अडचणी येऊ नयेत, त्यांची कामे थांबू नयेत, आरोग्य विषयामध्ये कमतरता जाणवू नये यासाठी नागरिकांना, कार्यकर्त्यांना भेटत असून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. आजही नियमितपणे त्यांचे काम तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने सुरू आहे. गेली सहा महिने ते खबरदारी घेऊन काम करत असताना बुधवारी त्यांच्यासोबत असणारे नेहमीप्रमाणे काम करणारे त्यांचे दोन कर्मचारी बाधित आढळले आहेत.

सुदैवाने दोघांची प्रकृती ठीक आहे. माजी आमदार गणपतराव देशमुख आपल्या दोन्ही सहकाऱ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहेत. सध्या तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. रुग्णांना बेड मिळणेही मुश्‍कील झाले आहे. यामुळे नागरिकांनी शक्‍यतो विनाकारण तसेच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. सध्या तालुक्‍यात जनता कर्फ्यू सुरू आहे. त्याची काटेकोरपणे अमंलबजावणी करुन प्रशासनाला सहकार्य करावे. या दोघांच्या अधिक संपर्कातील जे कोणी आले असेल त्यांनी आरोग्याची तपासणी करावी, असे आवाहनही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button