breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुख्यात वाहनचोर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरटे सुसाट आहेत. यातील नाशिक येथील कुख्यात वाहनचोर असलेल्या ‘बुलेटराजा’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्या धुळे येथील एका साथीदारालाही अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ७० हजारांच्या १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

हेमंत राजेंद्र भदाने (वय २४, रा. भोरवाडा, सातपूर, नाशिक) तसेच त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (वय २४, रा. गरताड, ता. जि. धुळे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

केटीएम दुचाकी चोरी केलेला चोर भोसरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पोलिसांची दोन पथके तयार करून सपाळा लावून आरोपी भदाने याला ताब्यात घेतले. त्याने १ सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून केटीएम दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. पिंपरी – चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद या भागात विक्री केल्या तसेच लपवून ठेवल्या असल्याचे उघड झाले. यातील १० बुलेट, दोन एफझेड, एक केटीएम व एक पल्सर अशा १४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, एमआयडीसी भोसरी, पुणे येथील भारती विद्यापीठ, सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर, तर नाशिक येथील सरकारवाडा, अंबड या पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली.

पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button