breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रयत्नांना यश, सातारा हद्दवाढीचा प्रश्न अखेर मिटला, अजित पवारांचे शिक्कामोर्तब

सातारा | भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मोठ्या प्रयत्नांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीवर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारच्या हद्दवाढीची काढलेली ऑर्डर शिवेंद्रराजे भोसले यांच्या ताब्यात आली आहे. जवळपास पन्नास वर्ष जुना प्रश्न मिटल्याने सातारकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

सातारा हद्दवाढीचा मुद्दा मान्य करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय झाला होता. या निर्णयामुळे भविष्यात सातारा ही महापालिका होण्यासाठी मदत होईल, या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. ग्रामपंचायत आणि दोन ग्रामपंचायतींचा अंशतः भाग यात समाविष्ट करण्यात आला आहे.

साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न 1971 पासून प्रलंबित होता. पुणे जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याने पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीला खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे सातारा हद्दवाढ हा पण प्रश्न लवकरच सोडवून टाकू” असं आश्वासन अजित पवार यांनी जून महिन्यातच दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button