breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारण

शिवसेवा ‘छपाक’च्या बाजूने…चित्रपट बायकॉट करणे चुकीचे असल्याचे संजय राऊत यांच मत…

दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या छपाक चित्रपट दिवसेंदिवस अडचणीत येतोय…मात्र अडचणीवर शिवसेनेने पाठिंबा देत फुंकर घातली आहे…, छपाकवर बंदी घाला, असे आवाहन सोशल मीडियावरून करणे चुकीचे आहे, असे मत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उसळलेल्या हिंसाचारानंतर दीपिका पदुकोण हिने जेएनयूला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. यानंतर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी दीपिकावर टीका करत छपाक चित्रपट बायकॉट करावा, असे आवाहन ट्विटरवरून सुरू केले. यामुळे छपाक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला.

दीपिका पदुकोण आणि छपाक चित्रपटाच्या बाजूने शिवसेना मैदानात उतरली आहे. दीपिका पदुकोणने उचललेले पाऊल योग्य असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जेएनयूमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तेथे गेली. तिच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो. दीपिकाची राजकीय भूमिका काय आहे, हे मला माहिती नाही. तिने त्याबद्दल कधी भाष्य केलेले नाही. मात्र, जेएनयूमधील विद्यार्थ्यांप्रति असलेल्या भावना तिने शांतपणे व्यक्त केल्या. केवळ या कारणामुळे तिला देशद्रोही ठरवले जात असेल आणि तिच्या चित्रपटावर बंदी घालण्याचे आवाहन केले जात असेल, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button