ताज्या घडामोडीमुंबई

पुढील आठवड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

मुंबई|विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी ७ मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मंगळवारी ८ मार्च रोजी राज्यातील पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.

यासोबत, नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले हवेच्या दाबाचे क्षेत्र मागील ६ तासांत १५ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकला आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. याचाच परिणाम म्हणून आज तामिळनाडूचा किनारी प्रदेश, पुडुचेरी, कराईकल, दक्षिण आंध्रप्रदेश आणि रायलसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button