breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

बारामती : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button