breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भिडे पूल पाण्याखाली, वाहतूक व्यवस्था कोलमडली

पुणे –  पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता.

शनिवार, रविवारनंतर सोमवारीही पुणे शहर आणि उपनगर भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून आठवड्याची सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत होताना दिसून आले आहे. शहरात रविवारपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत २६.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सकाळीही काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता़ दुपारी पुन्हा मुसळधार सरी येण्यास सुरुवात झाली़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली होती़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४०़४ मिमी पाऊस झाला़. रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़ मंगळवारीही शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button