breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ढोंगी कारभाराचा निषेध करुन ‘नंदीबैल आंदोलन’
पुणे |महाईन्यूज|
पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या ढोंगी कारभाराचा शिवसेनेच्या वतीने आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकरा वाजता जाहीर निषेध करण्यात आला. तसेच जागरण गोंधळ घालून नंदीबैल आंदोलन करण्यात आले.
पंचायत समितीची खेडची नवीन प्रशासकीय इमारतीला लोकप्रतिनिधीनी विरोध केल्याचा आरोप करीत जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर नंदीबैल आणि पारंपारिक जागरण गोंधळ घालून जिल्हा परिषदेला जाग आणली जाणार आहे. दरम्यान, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य या आंदोलनात सहभागी झाले