breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शिवसेनेचे किरण मोटे यांची राष्ट्रवादीत घरवापसी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माजी नगरसेवक किरण मोटे यांनी मोदी लाटेच्या मोहात पडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आज लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे. भव्य व्यासपीठावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ निगडी येथे जाहीर सभा सुरू आहे. या सभेत पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक किरण मोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या लाटेच्या मोहात पडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, तेथील अस्वस्थता पाहून त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घरवासली केली आहे.