breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना चिंचवड विधानसभा विभागीय कार्यालयाचे खासदार बारणे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, (महाईन्यूज) – मावळ लोकसभा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३ विधानसभा क्षेत्रात स्वतंत्र विधानसभा निहाय संपर्क कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिले चिंचवड विधानसभा शिवसेना विभागीय कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. 15) झाले.

या प्रत्येक विधानसभा कार्यक्षेत्रात या कार्यालयाच्या माध्यमातून विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बीएलए यंत्रणा सक्षमीकरणाचे मतदार यादी निहाय कामकाज केले जाणार आहे. पक्ष विस्ताराचे काम होणार आहे. तसेच, पक्षाचे समाज उपयोगी उपक्रम व आंदोलने विधानसभा, विभागनिहाय नागरिकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी शाखा प्रमुख स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व विभागप्रमुखाना माझा महाराष्ट्र – भगवा महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रभाग निहाय जनसंपर्कासाठी संपर्क कार्यालये व शाखा सुरू करून विविध योजना, शासकीय माहिती वाचनालय या माध्यमातून नागरिकांसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन जनमानसातील नगरसेवक, कार्यकर्ता म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन केले. विभागनिहाय संपर्क कार्यालयास व शाखास मी स्वत: भेटी देणार असून शिवसैनिकांनी नागरिकांची कामे माझ्याकडे घेऊन या असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी आमदार गौतम चाबूकस्वार यांनी शिवसेना पक्ष विस्तारासाठी मी स्वत: आमदार व लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त वेळ देणार आहे. त्याचा आपण शिवसैनिकांनी माझ्या अधिकाराचा, वेळेचा सदुपयोग समाजासाठी करावा व शिवसैनिकांनी स्वता:ची ताकद निर्माण करावी असे मनोगत व्यक्त केले. तसेच, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसेनेच्या प्रभागनिहाय, शाखानिहाय, पक्ष विस्ताराची संकल्पना शिवसैनिकांसमोर मांडली. प्रत्येक शिवसैनिकास सक्षम कार्यकर्ता म्हणून घडविणे हे उदिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सामूहिक परिश्रम घ्यावेत. २०१९ च्या विधानसभा व २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी जास्तीजास्त वेळ पक्षासाठी देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शहर प्रमुख योगेश बाबर,  शहर संघटिका उर्मिला काळभोर, यांनी मनोगत व्यक्त केले.

सर्व उपस्थितांचे स्वागत अनिता तुतारे यांनी केले व आभार अनंत कोऱ्हाळे यांनी मानले. याप्रसंगी विमल जगताप, शर्वरी जळमकर, प्रतिक्षा घुले, हरेश नखाते, विजय साने, चेतन शिंदे, सोमनाथ गुजर, विशाल गावडे, नाना सोनार, प्रदीप दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, स्वरूपा खापेकर, वैशाली काटकर, भाग्यश्री म्हस्के, बेबी सय्यद, मिरा बारसावडे, बाळासाहेब वाल्हेकर, उत्तम चौंरे, संतोष सौंदनकर, राहुल पालांडे, अभिजीत गोफण, संतोष तरस, वैशाली कुलथे, निलेश हाके, भाविक देशमुख, पल्लवी दांगट, हनुमंत माळी, उषा आल्हाट, प्रविण भोकरे, पाचपुते आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button