breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना गटनेत्याला आयुक्तांचे ओपन ‘चॅलेंज’; पुरावे देण्याचे केले आवाहन

  • बिल्डरांच्या एनओसीवरून प्रशासन अडचणीत
  • शिवसेना-आयुक्त यांच्यात वाकयुध्द

पिंपरी, (महा ई न्यूज) – कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकाम व्यवसायिकांना एनओसी देण्यास निर्बंध असताना केवळ आयुक्तांच्या सांगण्यावरून काही बिल्डरांना पाणी पुरवठा विभागाने ना हरकत दाखले (एनओसी) दिले आहेत. त्यावर भाजपला निवडणुकीसाठी फंड गोळा करून देण्याची सुपारी आयुक्तांनी घेतल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना बिनबुडाचे आरोप न करता कलाटे यांनी पुरावे सादर करावेत, असे ओपन ‘चॅलेंज’ आयुक्तांनी आज सोमवारी (दि. 8) केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये वाकडसह परिसरात नवीन बांधकाम प्रकल्पामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पवना धरणात मुबलक पाणी साठा असताना ऐन पावसाळ्यात पालिकेतील भाजपच्या स्थायी समितीने वाकडसह परिसरात बांधकाम प्रकल्पांना एनओसी देणे बंद केले होते. त्यानंतर सत्ताधारी व विरोधात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्या परिसरात पाणी टंचाईची सध्यस्थिती कायम असताना केवळ भाजपला निवडणुकीत फंड गोळा करुन देण्यासाठी आयुक्तांच्या सांगण्यावरुन पाणी पुरवठा अधिका-यांनी नवीन बांधकाम प्रकल्पांना एनओसी देण्यात येवू लागला आहे. दरम्यान, हे दाखले एकाच दिवसात देवून पुन्हा ते न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी भाजप नेत्यांचे नक्कीच घरगडी झाल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

याबाबत विचारले असता आयुक्त हार्डीकर म्हणाले, कलाटे यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्यांनी पुरावे सादर करावेत. त्यानंतर त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देणे उचीत ठरेल. असे बोलून आयुक्तांनी एकप्रकारे गटनेते कलाटे यांना ओपन चॅलेंजच केले आहे. आता कलाटे यांनी पुरावे सादर केल्यास आयुक्तांची भूमिका नेमकी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button