breaking-newsपिंपरी / चिंचवड

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जंयती सेवा सप्ताहानिमित्त ‘एलईडी’ बल्बचे वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचे औचित्याने पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग १७ मध्ये एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले. चिंतामणी चौकातील जनसंपर्क कार्यालयात दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी हा दोन दिवसीय उपक्रम राबविला जात असुन पाच हजार सनलाईट कंपनीचे एलईडी बल्ब सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे. मेक इन इंडीयाच्या पार्श्वभुमीवर व्होकल ते लोकल असा आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आपल्या जवळच्या नव उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे.

आमदार लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवारी प्रभाग क्रमांक १७ मध्ये प्रभागातील नागरिकांना प्रत्येकी वीज बिलानुसार दोन असे प्रति २० रु. या सवलतीच्या दराने दोन हजार पाचशे एलईडी बल्ब पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.  यावेळी, भाजपा शहर चिटणीस बिभीषण चौधरी, चिंचवड –किवळे मंडलाचे सरचिटणीस प्रदिप पटेल, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, किवळे मंडल चिटणीस संदीप पाटील, कामगार आघाडी उपाध्यक्ष शंकर पाटील, ओबीसी सेलचे अशोक बोडखे, योगेश महाजन, दिपक महाजन, रविंद्र पवार, शुभम ढाके आदी होते.

या उपक्रमाबाबत नामदेव ढाके म्हणाले की, ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब वापरण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेनुसार बल्बचे वितरण करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळवुन देण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. देशातील तरुणांना आपला व्यवसाय व्होकल ते लोकल आणि लोकल ते ग्लोबल करण्यासाठी चालना देण्यात येत आहे. आत्मनिर्भर योजनतेतून नवीन उद्योग सुरू होतील. यामुळे बेरोजगार व्यक्तींना काम मिळेल, असेही पक्षनेते ढाके यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button