breaking-newsताज्या घडामोडी

शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर

शिर्डी – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीच्या साई संस्थानच्या अध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची नियुक्ती केली आहे. गेले काही दिवस शिर्डी साई संस्थानचे काम त्रिसदस्यीय समिती पाहत होती. मात्र निर्णय घेण्याचे मुख्य अधिकार कोणाकडेही नव्हते. त्यामुळे आता शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची गुरुवारी नियुक्ती न्यायालयाने केली आहे.

यापूर्वी त्रिसदस्यीय समितीमध्ये विभागीय आयुक्त स्वामी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त गीता बनकर आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांचा समावेश होता. हीच समिती मंदिराचे प्रशासकीय काम पाहत होती. मात्र मुख्य आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कुणाकडेही नव्हता. त्यामुळे शिर्डी साई संस्थानचे महत्त्वाचे निर्णय होत नव्हते. म्हणून उत्तमराव शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीला मुख्य निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याची बाब समोर आणली होती. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांची शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्रिसदस्यीय समितीच्या सहाय्याने श्रीकांत आणेकर हे आता साई संस्थानचे मुख्य निर्णय घेतील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button