breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Qurantine असलेल्या आदिवासी महिलेवर CRPF जवानानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार

नक्षल प्रभावाखाली असलेल्या छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाला Qurantine असलेल्या आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.

पोलीस अधिक्षक (SP) शलभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जवान दक्षिण सुकमा जिल्ह्यातील दुब्बाकोटा भागात स्थित सीआरपीएफ कॅम्पमध्ये तैनात होता. बुधवारी २९ जुलै रोजी सायंकाळी पीडित महिलेनं पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला.

महिलेच्या आरोपानुसार, २७ जुलै रोजी सीआरपीएफ कॅम्पनजिक मैदानात ती महिलाआपल्या पशुंना चारा खाऊ घालण्यासाठी आपल्या बहिणीसोबत आली असताना जवान तिथं पोहचला. बहिणीनं कशीबशी आपली सुटका केली परंतु आरोपीनं महिलेवर बलात्कार केला. आरोपी परत जात असताना महिलेनं त्याला सीआरपीएफ कॅम्पकडे जाताना पाहिलं होतं.

घरी गेल्यानंतर महिलेनं ही हकीगत तिच्या कुटुंबातील काही सदस्यांना सांगितली. त्यानंतर गुरुवारी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला घेरलं आणि जवानावर कारवाईची मागणी केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुट्टीनंतर आरोपी जवान बालाघाटहून ड्युटीवर हजर झाला होता. तेव्हापासून तो सीआरपीएफ कॅम्पबाहेर दुब्बाकोटा गावातील शाळेच्या इमारतीत २१ दिवसांसाठी क्वारंटीन होता.

बस्तरसारख्या भागात तैनात पोलीस, पॅरामिलिट्री फोर्सचे कॅम्प्स इथं गरीब आदिवासींचं होणारं शोषण आणि अत्याचाराचा अंदाज या घटनेवरून येऊ शकतो, असं माजी आमदार आणि अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कुंजाम यांनी म्हटलंय. जवानांच्या अशा कृत्यांसाठी त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरायला हवं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button