TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव अनंतात विलीन

‘नेताजीं’ना निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी

मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोकांची गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद, असीम अरुण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींना अंतिम दर्शन घेतले.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव अनंतात विलिन झाले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोकांची गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद, असीम अरुण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींना अंतिम दर्शन घेतले.

मुलायमसिंह यादव यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना २२ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. १ ऑक्टोबर रोजी त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी मेदांता हॉस्पिटलच्या पीआरओने सांगितले होते की, युरिन इन्फेक्शनबरोबरच मुलायमसिंह यादव यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यानंतर, १० ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं.

पत्नीचं जुलैमध्ये निधन
मुलायमसिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं यावर्षी जुलैमध्ये निधन झाले होते. त्यांच्या फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधना मुलायमसिंह यादव या यादव यांच्या दुसरी पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्येच निधन झालं होतं.

नेताजींचा जीवनक्रम
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. पाच भावंडांमध्ये मुलायमसिंह यादव तीन क्रमाकांचे भाऊ होते. करिअरच्या सुरुवातीला ते पैलवान होते. तर, पेशाने ते प्राध्यापक होते. काही वर्षे त्यांनी इंटर कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवण्याचं होतं. मात्र, गुरू नत्थू सिंह यांच्या प्रभावाने मुलायमसिंह यादव राजकारणात आले. जसवंतनगर विधानसभेच्या जागेवरून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. १९८२-१९८५ पर्यंत ते विधानपरिषदेचे सदस्य राहिले.

लोहिया आंदोलनात मुलायमसिंह यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच काळात त्यांनी ४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. राजकीय आखाड्यातील पैलवान म्हणून मुलायमसिंह यादव यांची ओळख होती. आरोप-प्रत्यारोपांमध्ये ते माहीर होते. त्यांनी तीन वेळा राज्याची कमान सांभाळली. ते देशाचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. उत्तर प्रदेश विधानसभेचे ते आठवेळा सदस्य राहिले.

१९६७ साली मुलायमसिंह यादव पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर, ५ डिसेंबर १९८९ साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री बनले. सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी असा प्रवास करत समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली. १९६७, १९७४, १९७७, १९८५,१९८९ मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. तर, १९८९, १९९३ आणि २००३ मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

१९९६ मध्ये निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. २००४ रोजी ते मनपुरीतून लोकसभा निवडणूक लढले. २०१४ मध्ये त्यांनी आजमगढ आणि मैनपुरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही मतदारसंघातून ते जिंकून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी यश संपादन केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button