breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिरुरमध्ये विलास लांडेना डावललं, कोल्हेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  राष्ट्रवादी काॅंग्रेसने ऐनवेळी अभिनेता डाॅ अमोल कोल्हे यांना प्रवेश देवून शिरुर मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार विलास लांडे समर्थक दुखावले असून कोल्हे विरोधात फ्लेक्सबाजी सुरु केली असून कोल्हेंना निवडणुकीत आम्ही पाडणारचं, असं या फ्लेक्सवर म्हटले आहे. 

भोसरीत माजी आमदार विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स लावला आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार… आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार, लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली, पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार, कोल्हेला पाडणार, अशा आशयाचा मजकूर या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. अमोल कोल्हे यांचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार थंड पडल्याचं चित्र शिरूर मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे.

अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज मालिकेतून लोकप्रिय झाले. त्यांची लोकप्रियता लक्षात घेत विलास लांडे यांनी केलेल्या प्रचारात कोल्हे विजय होतील, अशी राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. पण उमेदवारीवरुन आता नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार मात्र थंड पडलाय.

शिरुरमध्ये विद्यमान खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनाच पुन्हा शिवसेनेकडून तिकीट देण्यात येणार आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्यांची लढत अमोल कोल्हेंविरुद्ध होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button