breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

शिराळा तालुक्यातील मणदूर, आरळा भागात सॅनिटाईझर वाटप; भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम

शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे मणदूर आणि आरळा भागात सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले, अशी माहिती ‘भाजयुमो’ जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी दिली.

कोविड योद्धा म्हणून काम करणारे सरकारी कर्मचारी, पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी, गावातील आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवक यांना  माजी सभापती मा.हणमंत पाटील (बापू) यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. त्यावेळी भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, अभिजित खांडेकर, अमर पाटील, बाबाजी घोडे पाटील, शंकर शिंदे उपस्थित होते.

त्याचबरोबर माजी सभापती हणमंतराव पाटील (बापु) यांनी जि. प. सदस्या शारदा हणमंत पाटील यांच्या जि.प.स्वीय निधीतून 5 लाख रुपयांच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले. तसेच, मणदूर, चरण विभागातील  कोरोना आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विभागास त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, अर्सेनिक अल्बम 30 औषधाचे वाटप गगनगिरी मेडिकल, कोकरूड यांचे मार्फत अभिजित खांडेकर यांनी बापूंच्या हस्ते  करण्यात आले. अभिजित खांडेकर यांनी बापूंच्या जि.प. मतदारसंघातील अन्य गावांतही या गोळ्यांचे वाटप करणार असल्याचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button