breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण समिती सभापती पदी सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड

पिंपरी –  महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती पदी नगरसेविका सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापतीपदी नगरसेविका शर्मिला बाबर यांची वर्णी लागली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज (सोमवारी) शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी असलेले महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी जाहीर केले.

यावेळी महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती सोनाली गव्हाणे आणि उपसभापती शर्मिला बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, संजय नेवाळे उपस्थित होते. दरम्यान या शिक्षण समितीत भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांची महासभेत निवड करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button