breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षकांमुळेच सुसंस्कृत नागरिक घडतात – ज्ञानेश्वर लांडगे

ब्रिटिश कौन्सिल इंटरनॅशनल स्कूल अवॉर्डसाठी एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची निवड

पिंपरी | प्रतिनिधी

एकविसाव्या शतकात सुशिक्षित, सुसंस्कृत नागरीक घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. पीसीईटीच्या एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक ही जबाबदारी आत्मविश्वासाने, सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यामुळेच ‘ब्रिटिश कौन्सिल इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय नामांकीत पुरस्कारासाठी शाळेची निवड झाली. ब्रिटीश कौन्सिल इंटरनॅशनल स्कूल अवॉर्डच्या वतीने प्रसिध्द केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पुरस्काराने एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्‌गार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन (पीसीईटी) या नामांकीत शिक्षण संस्थेच्या रावेत येथील एस. बी. पाटील स्कूल मध्ये मागील शैक्षणिक वर्षात ‘ विद्यार्थी केंद्र बिंदू‘ मानून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, मुख्य पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, ब्रिटीश कौन्सिलच्या समन्वयक अंजली गुगळे, उपपर्यवेक्षिका निरीपमा काळे, शुभांगी कुलकर्णी, अर्चना प्रभुणे, वंदना सांगळे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम करुन घेतले व त्याचे उत्कृष्ठ सादरीकरण केले.

यामध्ये भारत, जर्मनी, फ्रान्स या देशातील जल, वायू आणि रस्ता वाहतूक व्यवस्था याचे अवलोकन, वाहतूकीचे नियम व आधुनिक यंत्रणा यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांची प्रतिकृती आणि पावरपॉईंट सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या देशातील ई – कच-यांचे व्यवस्थापन पारंपारीक शेतीची पध्दत, भारतातील आदिवासी संस्कृती, कलाकृती या विषयांवर ऑनलाईन परिसंवाद घेण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील तुलनात्मक अभ्यास करता आला. त्यामुळे त्यांना आपले विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यास संधी मिळाली. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व्दिगुणीत झाला व आणखी शिकण्याची इच्छाशक्ती वाढली अशी माहिती मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button