breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेला खिंडार, ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई – कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला असून, शहरातील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे संस्थापक सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम शिवसेनेत प्रवेश केला आहे.

वाचा :-‘मुख्यमंत्री महोदय…काय चाललयं आपल्या राज्यात ?’ ‘त्या’ घटनेनंतर चित्रा वाघ यांचा सवाल

राजेश कदम यांनी शिवबंधन हाती बांधल्याने मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत याचा मोठा फटका मनसेला बसण्याची शक्यता आहे. या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

राजेश कदमसह मनसेतील इतर डझनभर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत. शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वाव या सर्व तरुणांना दिला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button