breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शासन नियमांनूसार बिलांची आकारणी करु; पण गुन्हेगारांसारखी वागणूक नको, डाॅक्टरांची तक्रार

रुग्णालय मालकांची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे ग-हाणे

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

शासनाने बिलांसदर्भात केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. तरीही महापालिकेचे अधिकारी बिलांबाबत नाहक त्रास देत आहेत. आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत, अशी तक्रार डाॅक्टर करीत असून त्यांनी ऑक्सिजनचा नियमित पुरवठा, विविध समस्यांचा पाढा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे वाचला.

कोविड रुग्णांवर उपचार केले जात असलेल्या ग्लोबल हॉस्पिटल काळेवाडी फाटा, वास्लय हॉस्पिटल थेरगाव, मेट्रो हॉस्पिटल काळेवाडी, लाइफ पॉईट हॉस्पिटल वाकड, स्पंदन हॉस्पिटल थेरगाव, गोल्डन केअर हॉस्पिटल भूमकर चौक, फिनिक्स हॉस्पिटल काळेवाडी फाटा, प्लस हॉस्पिटल ताथवडे, जीवन ज्योती हॉस्पिटल काळेवाडी,ओझस हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल, भोईर हॉस्पिटलच्या मालकांनी खासदार बारणे यांची भेट घेतली.

बिलांच्या ऑडीटसाठी 12-12 तास बसवून ठेवले जाते. त्याचा कामावर परिणाम होत आहे. संबंधित अधिकारी आमच्यावर गुन्हेगारांसारखे वागतात. त्यांनी सूचनांचा योग्यरित्या अभ्यास केल्याशिवाय आम्हाला सूचना पाठविल्या आहेत. आमच्याविरोधात बिलाबाबत पालिकेच्या काही तक्रार आल्यास आम्ही सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही आधीपासूनच या कोविड परिस्थितीत दडपणाखाली काम करत आहोत. त्यामुळे असा छळ थांबविण्याचे निर्देश द्यावेत. त्रास असाच सुरू राहिल्यास या परिस्थितीत कोविड केंद्रे बंद करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही.

बिलिंगसंदर्भात लेखापरीक्षण विभागाकडून होणारा त्रास थांबविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी हॉस्पिटल मालकांनी खासदार बारणे यांच्याकडे केली. सर्व रुग्णांचे तपशील, विविध डॅशबोर्ड, ईमेल आणि व्हॉट्स ॲपवर अपलोड करण्याचा सरकारचा आग्रह आहे. आम्हाला याचा त्रास नाही. परंतु, साथीच्या आजाराच्या गंभीर स्थितीमुळे हे लिपिक कार्य करण्यासाठी आमच्याकडे कर्मचा-यांची तीव्र कमतरता आहे. ही कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आमचे वैद्यकीय कर्मचारी त्यात गुंतात. त्यामुळे गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ कमी पडतो, याकडेही हॉस्पिटल मालकांनी खासदार बारणे यांचे लक्ष वेधले.

आम्ही सर्व शासकीय नियम व दर चार्ट पाळत आहोत. जर तुम्हाला कोणत्याही रुग्णालयाविरूद्ध अनेक तक्रारी आल्या तर तुम्ही त्वरित ऑडिट करा आणि आवश्यक ती कारवाई करू शकता. परंतु रोजच्या आधारे ही सर्व कागदपत्रे व्यवस्थापित करणे फारच अवघड आहे. दस्तऐवजीकरणा संदर्भातील आमच्या कामातील सुलभतेसाठी कोविड डेटा अपलोड करण्यासाठी त्यांचे एक पोर्टल असावे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रूग्णांचा डेटा अपलोड करणे खूप कठीण आहे. सर्व आघाड्यांच्या अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्ही रूग्णांना उत्तम सेवा पुरवित आहोत. पण काही रुग्ण शासनाच्या निकषांनुसार बिले देत नाहीत, अशा परिस्थितीत आपण काय करावे, अशी अपेक्षा आहे? आम्ही आमचे सर्व प्रयत्न, मनुष्यबळ ठेवून, जोखीम स्वीकारून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठिंबा देत आहोत.

मानवतेच्या पार्श्वभूमीवर समर्पित सेवा देत आहेत. म्हणून आम्हाला छळ करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून संरक्षण आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशा विविध अडचणींचा पाढा हॉस्पिटल चालकांनी खासदार बारणे यांच्यासमोर वाचला आहे.

खासदार बारणे म्हणाले, काळ कठीण आहे. त्यामुळे पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवू नका, रुग्णसेवेला प्राधान्य द्या. सरकारच्या आदेशाचे पालन करूनच बील आकारणी करावी. गोरगरिबांकडून जास्त बिले आकारू नका. रुग्णांची अडवणूक करण्यात येवू नये. कोरोना रूग्णांना उपचाराकरीता तात्काळ मदत करावी. सर्वांना सहकार्य करावे. पालिकेकडून होणाऱ्या त्रासाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. तुमच्या समस्या शासन दरबारी मांडल्या जातील. वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत पालिकेला सांगितले जाईल. नाहक त्रास देवू नका, अशी सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिली जाईल, असे आश्वासन खासदार बारणे यांनी हॉस्पिटल मालकांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button