breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळा सुरु झाल्याने आधी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करा, शिक्षण विभागास कोर्टाचे आदेश

  • 10 जुलैपर्यंत ठेकेदारांना वाटप आदेश द्या, नवीन करारनाम्याबाबत शिक्षण विभागास फटकारले

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरु होवून तीन आठवडे उलटले आहेत. तरीही शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिणींना शालेय साहित्य न मिळाल्याने कोर्टाने शिक्षण विभागाच्या अधिका-यांना फटकारले आहे. अगोदर मुला-मुलींना गणवेशाचे वाटप करा, त्यानंतर नवीन करारनामासंर्दभात सुनावणी घेवू, असे आदेश दिले. तसेच संबंधित ठेकेदाराला 10 जुलैपर्यंत गणवेश वाटपाचे आदेश देण्याची सुचना महापालिका शिक्षण विभागास करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेशासह अन्य शालेय साहित्य मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळा 17 जूनला सुरु होवूनही आजपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप झालेले नाही. महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 55 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन आठवडे होवून अधिका-यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे साहित्य मिळालेले नाही.

महापालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी पुर्वीचे करारनामे रद्द करुन शिक्षण विभागातील ठेकेदारांचे नव्याने करारनामे करण्याबाबत सुचना केल्या होत्या. तसेच शालेय साहित्य वाटपाविषयी डीबीटी योजना देखील राबवण्याची तयारी करण्याचे परिपत्रक काढले होते. मात्र, काही ठेकेदारांनी पुर्वीच्या करारनाम्यानूसार शालेय साहित्य वाटपाचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यास आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी नकार दिला होता. त्यामुळे ठेकेदार आणि आयुक्तांचा वाद कोर्टात गेला होता.

दरम्यान, गणवेश वाटपाबाबत शिवाजीनगर न्यायालयाने महापालिका शिक्षण विभागास फटकारले आहे. अगोदर सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करा, त्याबाबत 10 जुलैपर्यंत ठेकेदारांना वाटपाचे आदेश द्यावेत, असे आदेश दिले आहेत. तसेच शिक्षण विभाग आणि ठेकेदारांच्या करारनाम्याबाबत 31 जुलैला पुढील सुनावणी घेण्यात येईल, असेही कोर्टाने म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button