breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी – चिंचवड आरटीओला चार हेक्टर जागा उपलब्ध

  •  परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांची माहिती

पिंपरी | प्रतिनिधी 

चिखलीतील पेठ क्रमांक १३ मध्ये चार हेक्टर जागेवर पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि वाहन तपासणी केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत सन २०२१ च्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय कपात सूचना मांडली होती. पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सध्या मोशी – संतनगर येथे १.३० हेक्ट जागेत कार्यरत आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची मागणी वाढत आहे. मात्र, पिंपरी – चिंचवड आरटीओसाठी वाहन तपासणी वेंâद्राकरिता सध्याची जागा अपुरी पडत आहे. या कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी चिखली येथील चार हेक्टर सरकारी जागा आरटीओकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली होती.

त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. राज्य सरकारच्या महसुल व वन विभागाने चिखली येथील गट क्रमांक ५३९ मधील पेठ क्रमांक १३ मधील चार हेक्टर जागेवर पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि वाहन तपासणी केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या जमिनीचा ताबा २४ ऑगस्ट २०२१ रोजी पिंपरी – चिंचवड आरटीओला मिळाला आहे. या जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि वाहन तपासणी केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे लेखी उत्तर परब यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button