breaking-newsमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘कोरोना’ चाचणी करणार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी खासदार रेखा आपली ‘कोरोना’ चाचणी करुन घेणार आहेत. सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. आता खबरदारीसाठी रेखाही आपली टेस्ट करुन घेणार आहेत.

रेखा यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख ‘फिल्मफेअर’ने केला आहे. रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ बंगला आहे. बंगल्याबाहेर नोटीसवर कंटेन्मेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे.

दुसरीकडे, बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या बच्चन कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी महानायक अमिताभ बच्चन, त्यानंतर त्यांचे पुत्र-अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्यानंतर सून-अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सुदैवाने बिग बी यांच्या पत्नी आणि खासदार-अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button