breaking-newsराष्ट्रिय

शहीद जवान औरंगजेब यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

श्रीनगर : भारतीय जवान निधड्या छातीने जिवाची पर्वा न करत सीमेवर देशाचे संरक्षण करत असतात. भारतीय सैनिकांची हिमतीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. शुक्रवारी जम्मूच्या पुलवामा येथे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबच यांचा हा व्हिडीओ आहे.

औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. औरंगजेब यांची हत्या करणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत औरंगजेब निर्भिडपणे दहशतवाद्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. ‘तू मेजर शुक्ला यांचा गार्ड आहेस का?’, असा प्रश्न दहशतवादी औरंगजेबला विचारला. त्यावर औरंगजेबने यांनीही ‘होय’ असे उत्तर दिले.

मेजर शुक्ला यांच्या नेतृत्वातील टीमने दहशतवादी समीर अहमद भट उर्फ समीर टायगरचा खात्मा केला होता. दहशतवादी समीर टायगरने अतीउत्साहात व्हिडीओ मेसेजच्या मदतीने मेजर शुक्ला यांना आव्हान केले होते. ‘आईचं दूध प्यायलं असेल तर समोर ये आणि लढ’, असं आव्हान समीर टायगरने मेजर शुक्ला यांना दिलं होतं. धमकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत मेजर शुक्ला यांनी समीर टायगरला यमसदनी धाडलं होतं.

समीर टायगर 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. समीर पुलवामाचा रहिवासी होता. तसंच हिजबुलच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. बुरहान वाणीनंतर समीरला काश्मीरच्या पोस्टर बॉयच्या रुपात सादर करण्यात आलं होतं. समीरने दहशतवादी वसीमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोळीबारही केला होता. यामुळेच समीर टायगरवर 10 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.

औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य होते. औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवत त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button