breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला
डोंबिवली | डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनी भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
एवढेच नाही तर स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग झपाट्याने वाढत असल्याची माहिती मिळाली आहे.