breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरात पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईचा जोर ओसरला

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईचा जोर ओसरला आहे. 100 ते 150 च्या आसपास होणा-या कारवाईचा आकडा शनिवारी (दि. 26) 93 वर आला आहे. त्यामुळे प्रतिबांधात्मक कारवाई करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे की काय ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काळात पोलिसांकडून टाळेबंदीचे उल्लंघन करणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यानंतर टाळेबंदीमधून जसजशी शिथिलता येईल, तसतशी कारवाईची आकडेवारी देखील कमी होत आली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची बदली झाली. त्यांच्याजागी कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कारवाईने पुन्हा जोर पकडला होता. मात्र, एकाच महिन्यात पुन्हा हा जोर ओसरला आहे. टाळेबंदीतून काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काही आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शनिवारची (दि. 26) कारवाई

एमआयडीसी भोसरी (5), भोसरी (2), पिंपरी (0), चिंचवड (4), निगडी (7), आळंदी (1), चाकण (0), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (18), वाकड (11), हिंजवडी (24), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (7), रावेत चौकी (), शिरगाव चौकी (0)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button