breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात खाजगी, सिटी केअर, जीवन ज्योती रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट; कडक कारवाई करण्याची आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, डिवाइन हॉस्पिटल हे रुग्णांची बिलासाठी मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असून त्यांना भस्म्या रोग असल्यासारखे नागरिकांकडून पैसे उकळत आहेत, तरी हे थांबविण्यासाठी संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्य शासनाने कोरोना विषाणू कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू करून अधिसूचना निर्गमित केलेली आहे. ज्याअर्थी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड -१९ बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत अनेक तक्रारी शासन स्तरावरती प्राप्त झाल्या नुसार दि.२१ मे २०२० च्या अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय बिलाचे लेखा परिक्षण करणे गरजेचे असल्याचे समजते. तरी आपल्या स्तरावरून आपण समितीचे गठण करून नेमलेले अधिकारी यांनी काही खाजगी रुग्णालयांवर नोटीस देण्याची कारवाई केली. परंतु, या खाजगी रुग्णालयांवर याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. त्यांनी गरिबांना लुटायचे ठरविलेलेच आहे असे दिसते. आपण गठीत केलेल्या पथकाची माहिती हि शहरातील नागरिकांपर्यंत अद्यापही पोहचलेली नाही. यामुळे शहरातील कोविड बाधित रुग्णांना बिलासंदार्भातील अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे असे दिसून येते.
आपल्या सारथी तसेच पिं.चिं.मनपाच्या ऑफिशीअल संकेतस्थळ यांवर कोविड १९ च्या पथकाची कोणतीही माहिती नोंदवली गेली नसून याचा नागरिकांना नाहक त्रास होताना दिसत आहे. नागरिकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यासाठी आपण आपल्या सर्व संकेतस्थळावर नागरिकांसाठी कोविड १९ च्या पथकाची माहिती, दूरध्वनी क्रमांक, व्हाटस अप क्रमांक उपलब्ध केल्यास नागरिकांच्या बिलासंदार्भातील समस्यांचे निवारण लवकरात लवकर होईल व शहरातील खाजगी रुग्णालयातून गोरगरीब नागरिकांची होणारी लुटमार कमी होऊन खाजगी रुग्णालयांना चाप बसेल. आमच्या कार्यालयामध्ये वारंवार कोविड १९ च्या बिलासंदार्भातील तक्रारी मध्ये वाढ होत असून त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, जीवन ज्योती हॉस्पिटल, डिवाइन हॉस्पिटल हे रुग्णांची बिलासाठी मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असून त्यांना भस्म्या रोग असल्यासारखे नागरिकांकडून पैसे उकळत आहेत, तरी हे थांबविण्यासाठी संबंधित रुग्णालयांवर कडक कारवाई करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button