breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात ‘करोना’चा आणखी एक रुग्ण तबलिगीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण; भिती आणखी वाढली!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले करोनाचे दोन रुग्ण काल (गुरुवारी) आढळल्यानंतर आता आणखी एका रुग्णाची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

शहर करोनामुक्तीच्या दिशेने जात असताना दोन दिवसांत तीन रुग्णांची भर पडल्याने शहरवासियांमध्ये करोनाची भिती पुन्हा वाढली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील करोना बाधितांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे. त्यापैकी 11 जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आल्याने चार रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीतील इज्तेमा कार्यक्रमाला शहरातील 33 व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यापैकी 23 जणांना तसेच त्यांच्या पाच नातेवाईकांना महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी गुरुवारी आलेल्या अहवालानुसार दोघांना लागण झाली होती. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुणे आज तपासासाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाला पॉझिटीव्ह आल्याने त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार चालू करण्यात आले आहेत. आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून 396 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 329 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या 15 पैकी एकूण 11 जण बरे झाल्यामुळे त्यांनाही सोडण्यात आले असून 48 रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. तर करोनाची लक्षणे दिसणार्‍या तसेच निगेटिव्ह आलेल्या एकुण 1669 जणांना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.‘ते’ दहाजण अद्यापही गायबदिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगींच्या इज्तेमा या कार्यक्रमाला उपस्थिती राहिलेल्या शहरातील 33 पैकी 23 जणांचा शोध घेण्यात यश आले असले तरी अद्यापही दहाजण गायब आहेत. हे लोक शहरात आहेत की बाहेर हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने शहरवासियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यातच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले दोनजण तसेच त्यांचा एक नातेवाईक पॉझिटिव्ह आल्यामुळे भितीमध्ये भरच पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button