breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण

बेळगाव – कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते.

गुरुवारी सकाळी बेळगावात रोड शोत देखील ते सहभागी झाले होते. पण रोड शो अर्ध्यावर सोडून ते हॉटेलवर परतले. नंतर त्यांनी बंगळुरुला प्रयाण केले. गुरुवारी सकाळी रामय्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी टेस्ट केली. त्यानंतर त्यांना कोरोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेळगावात प्रचाराच्या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री उमेश कत्ती, जगदीश शेट्टर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या समवेत प्रचाराच्या वेळी होते. भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि अनेक कार्यकर्ते देखील प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या संपर्कात होते.

‘मला हलका ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यात मला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी विनंती आहे की, जे कुणी मागच्या दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी काळजी घ्यावी आणि वैयक्तिक क्वारंटाइन व्हावं’ असं विनंती करणारं ट्वीट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही करोनाची लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलीलाही करोना झाल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. योग्य उपचाराअंती दोघांनी करोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button