breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील बेवारस वाहनावर कारवाई करा

महापाैरांच्या उपप्रादेशिक अधिका-यांना सुचना 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करणे, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने हटविण्यात याव्यात, अशा सुचना महापौर राहुल जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना दिल्या. 

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी महापौर राहूल जाधव यांच्या दालनात आज (बुधवारी) भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील वाहतुक व्यवस्थेबाबत चर्चा केली. तसेच महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयास रात्री २.३० वाजता अचानक भेट दिली. तेथील बरेच रुग्णांचे नातेवाईक उघड्यावर झोपल्याचे निदर्शनास आले. त्यांना थंडीच्या दिवसात अंगावर घेण्यासाठी अंथरुण नसल्याचे दिसून आले. वायसीएम रुग्णालयात येणारे रुग्ण हे सामान्य, गरीब कुटूंबातील असतात. त्यांना विश्रांतीसाठी स्वतंक्ष कक्ष असणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्त यांचेबरोबर शुक्रवार दिनांक २५ रोजी मिटींग घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी
वायसीएम मध्येच व्यवस्था करणेबाबत निर्णय घेऊ, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button