breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अपंग केंद्राच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी-  अपंगासाठी पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे, मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. मोरवाडी येथे नि:समर्थ (अपंग) साठी बांधण्यात येणा-या कल्याणकारी केंद्राचे भूमिपूजन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, माजी महापौर व नगरसदस्या मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे उपस्थित होते.

शहरातील अपंगांसाठी बांधण्यात येणाऱ्या अपंग केंद्रामध्ये तळमजल्यावर चारचाकी, दुचाकी व सायकल पार्किंग तसेच मुलांसाठी खेळण्याचा बगीचा व चौकीदार रूम असणार आहे. पहिल्या मजल्यावर 600 लोकांसाठी मल्टीपरपज हॉल, स्वागत कक्ष, कार्यालय, जॉईन टिचिंग स्टाफ रूम, स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह व आउटरीच रूमची सुविधा असणार आहे. दुस-या मजल्यावर अधिष्ठता केबिन, बहुअपंग क्लास रूम, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, ग्रंथालय, ब्रेन लिपी, संगीत रूम, व्यवसाय उपचार विभाग, चित्रकला वर्ग, हस्तकला, ई-लर्निंग कक्ष इत्यादी सुविधा असणार आहेत. तिस-या व चौथ्या मजल्यावर सुधार उद्देशक वर्ग, द्रुष्टी बाधित वर्ग, स्वमग्न वर्ग, बालवर्ग, टेलरिंग व ब्युटीशियन कोर्स वर्ग, व्यवसाय प्रशिक्षण श्रवण व वाचा, भौतीकोपचार व मानसोपचार विभाग आणि टेरेस वर पॅनल कव्हर इत्यादींची व्यवस्था असणार आहे. यासाठी 8 कोटी 6 लाख 72 हजार इतका खर्च येणार आहे. सदरच्या कामाची निविदा मे.देव कंन्स्ट्रूक्शन यांना दिली असून हे काम 18 महिण्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button