breaking-newsआंतरराष्टीय

इथिओपियन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 18 मृत्युमुखी

अद्दिस अबाबा – इथिओपियामध्ये गुरूवारी त्या देशाच्या लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याने 18 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 15 सैनिक आणि 3 नागरिकांचा समावेश आहे. ही दुर्घटना इथिओपियाच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या ओरोमिआ प्रांतात घडली.

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर डायर दावामधून हवाई दलाचे मुख्यालय असणाऱ्या बिशोफ्तू शहराकडे निघाले होते. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारा कुणीच दुर्घटनेतून बचावू शकला नाही. हेलिकॉप्टर कोसळण्यामागचे कारण तातडीने समजू शकले नाही. इथिओपिया सरकारने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारने दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. याआधी 2013 मध्ये इथिओपियन लष्कराचे मालवाहू विमान मोगाडिशूमध्ये कोसळले होते. त्या दुर्घटनेत चौघे मृत्युमुखी पडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button